धाराशिव (प्रतिनिधी)-  निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद उधाण, झुलते हळूच दत्ताची पालखी.. यासह एकापेक्षा एक सरस भक्तीगीत, गवळण व भैरवी प्रसिद्ध गायक, तानसम्राट अजित कडकडे यांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 धाराशिव येथील शांतिनिकेतन -सद्गुरू कॉलनी येथे श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच वतीने त्रैलोक्याचे स्वामी भगवान, परम श्रद्धेय श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित गुरूचरित्र पारायण- भजन- कीर्तन सप्ताह सोहळ्यात बुधवारी (दि.11) तानसम्राट अजित कडकडे यांचा भजनसंध्या कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी तानसम्राट कडकडे यांनी जय दत्त दत्त अखंड गाती भक्त.., नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंगा.., गुरूविण नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यासरे.. या भक्तीगितांसह गवळण व भैरवी गाऊन भक्तांना जवळपास साडेतास खिळवून ठेवले. टाळ्यांचा कडकडाट करून प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त दाद दिली. कडकडे यांना प्रकाशचंद्र वगळ - हार्मोनियम, रुपक वझे - तबला, दिनकर भगत पखवाज, उल्हास दळवी तालवाद्य, सहगायक किशोर देसाई, भजनसम्राट शिवकुमार मोहेकर यांनी साथसंगत दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रभाकर चोराखळीकर, नरसिंह जोशी, अनंत व्यास, डी.व्ही. कुलकर्णी, एम.सी. कुलकर्णी, संतोष देवळकर, गायकवाड, चंद्रसेन पिसाळ, सिद्धेश्वर जोशी, धनंजय देशपांडे, संतोष बडवे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top