धाराशिव (प्रतिनिधी) - भारतरत्न, बोधिसत्व, महामानव बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन व पुस्तकांचे संकलन, रक्तदान करुन भिमाच्या लेकरांनी व भीम अनुयायांनी शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास दि.6 डिसेंबर रोजी अभिवादन केले.
धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राजश्री कदम यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डॉ आंबेडकर यांना महासभेच्यावतीने सामूहिक त्रिशरण, पंचशील गाथा कथन व अभिवादन केले. तर समता सैनिक दलाच्यावतीने सैनिक दलाचे असिस्टंट युनिट लीडर सचिन दिलपाक यांच्या मार्गदर्शनाखाली सलामी देत मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष विजय बनसोडे, सपोनि घाडगे, दादासाहेब जेटीथोर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय वाघमारे, रणजीत गायकवाड, अतुल लष्करे, स्वप्नील शिंगाडे, मीनाताई लगाडे, डॉ सुनील माळाळे, सुनील वाघमारे, डॉ शिवाजी ओमन, सोमनाथ गायकवाड, स्वामीराव चंदनशिवे, बाबासाहेब कांबळे, राजाराम बनसोडे, विजयमाला धावारे, राकेश जानराव, मुकेश मोटे, बाबासाहेब जानराव, किरण बिडवाल, आनंद गाडे, सचिन गायकवाड, शीलाताई चंदनशिवे, सुरेखा सरवदे, जयश्री चव्हाण, मनोरमा काटे, स्वराज जानराव, सुगत सोनवणे, नितीन लांडगे, लक्ष्मण सोनवणे, अमोल लांडगे, प्रतीक चंदनशिवे, सौरभ शिंगाडे, यशवंत शिंगाडे, रोहिणी बर्वे, विद्यानंद वाघमारे, दत्तात्रय लोखंडे आदींसह भीम आणि आई सकाळपासूनच अभिवादनासाठी पुतळा स्थळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक समरसता मंचच्यावतीने रक्तदानाने अभिवादन
सामाजिक समरसता मंचच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक समरसता मंचच्यावतीने डॉ आंबेडकर पुतळा चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्त संकलन सह्याद्री ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आले. यावेळी सचिन सुर्यवंशी, प्रा सोमनाथ लांडगे, राजेंद्र कापसे, अभिजीत लष्करे, गणेश वाघमारे, सिद्धार्थ बनसोडे, सह्याद्री ब्लड बँकेचे रक्त संकलन प्रमुख शशिकांत करंजकर, अल्केश बोरेगावकर, महेश तोडकरी, डिन मुलकू नाईक, साक्षी वाळके, शुभांगी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ आंबेडकर यांना अभिवादन केले.
रांगोळीतून चित्र साकारुन अनोखे अभिवादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रमाई फाउंडेशनच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विविध हृदयस्पर्शी व मोहक चित्रे रांगोळीतून साकारून अनोखे अभिवादन करण्यात आले. येरमाळा येथील मूकबधिर असलेले कलाकार रविशंकर बारस्कर यांनी ही कलाकृती 1215 फुट आकारात साकारली. या रांगोळीच्या माध्यमातून..... लोकशाहीला घातक असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे हुकूमशाही आणि माणसा माणसांमध्ये भेद मानणारी संस्कृती... हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. हे रांगोळीतील साकारलेले शिल्प पाहण्यासाठी दिवसभर भीम अनुयायांनी गर्दी केली होती.
रा.प.म. विभागीय कार्यशाळेत डॉ आंबेडकरांना अभिवादन
धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस इलेक्ट्रिशियन प्रमुख राजू कवळीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यंत्र अभियंता सुर्यकांत थोरबोले, उपयंत्र अभियंता मिथुन राठोड, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रामेश्वर धावारे, जनार्दन माने, ज्योतीराम संकपाळ, प्रफुल्ल कस्तुरे, विजय मुंडे, अशोक म्हेत्रे, विजय कांबळे, तम्मा गायकवाड, सुनील जाधव, महेश तिगाडे, शंकर साळुंके, संजीव भोसले, ज्योत्सना सोनवणे, सचिता आगळे, प्रियंका कांबळे, सतीश कोळी, रणजीत पवार, वसंत अलकुंटे, श्रीपाद जोशी, दयानंद स्वामी काशिनाथ घोडके अण्णासाहेब जाधव, रईस काझी, रणवीर गवळी, सतीश नाईकवाडे, संदीप सुरवसे, उमेश खराडे, प्रवीण सर्जे, रोहन आदमाने, दर्शन सोनवणे, ऋतिक गोरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान करुन डॉ आंबेडकरांना अभिवादन
धाराशिव येथील प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने शाहू फुले आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 106 भीम अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ स्मिता गवळी, अब्दुल लतिफ, प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे, नागराज साबळे, शैलेंद्र शिंगाडे, प्रमोद हावळे, प्रज्योत बनसोडे, यशवंत माळाळे, बाळू सरवदे, दादासाहेब मोटे, जीवन भालशंकर, रुपेश बनसोडे, पृथ्वीराज सरवदे, अतुल नाईकवाडी, सचिन बनसोडे, लखन गायकवाड, सारिका भोसले, नेहा बनसोडे, लक्ष्मी ढाले, रेणुका बनसोडे, निलेश चिलवंत, निहाल शेख, गणेश वाघमारे, इम्रान पठाण, महादेव भोसले आदींसह भीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वही व पेनचे संकलन करून डॉ आंबेडकरांना अभिवादन
बहुजन विद्यार्थी सामाजिक संघटनेच्यावतीने अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसाठी वही व पेन दान करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष स्वराज जानराव यांनी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत दानशूरांनी एक वही व एक पेन देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी पृथ्वीराज चिलवंत, सुनील ढगे, रणवीर इंगळे, सतीश बनसोडे, शिलरत्न भालशंकर, राहुल वाघमारे, अमोल वाघमारे,उदयराज बनसोडे, गणेश वाघमारे, मेसा जानराव, प्रमोद हावळे, बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे,अक्षय जोगदंड, स्वप्नील शिंगाडे, अतुल लष्करे, सोहम बनसोडे, आदिनाथ सरवदे, प्रभाकर सोनवणे, शितल चव्हाण, हर्षवर्धन बनसोडे, संदीप बनसोडे, तेजस वाघमारे, विशाल घरबुडवे आदींसह इतर दानशुरांनी एक वही व एक पेन देऊन सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दररोज अभ्यास करावा - डॉ. वाहूळे
तुळजापूर - शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्या राहणार नाही, हा बाबासाहेबांचा संदेश घेवून, सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून दररोज किमान तीन तास अभ्यास करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दररोज आठरा तास अभ्यास करते होते. म्हणूनच ते आज अमेरिका या देशात ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. हाच आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे, असे आवाहन अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे डॉ.विवेकानंद वाहूळे यांनी दि.6 डीसेंबर रोजी केले.
तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. त्यावेळी डॉ वाहूळे बोलत होते. यावेळी अभिवादन सभेचे अध्यक्ष म्हणून शा.व्य. समितीचे अध्यक्ष प्रविण मशाळकर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले. तर प्रविण माशाळकर यांनी डॉ.विवेकानंद वाहूळे यांचे आभार मानून हर घर संविधान या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शाळेच्यावतीने डॉ.विवेकानंद वाहूळे यांना....आंबेडकरी कविता.... हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश ढोणे यांनी तर आभार मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न.प.प्रा.शा. क्र.2 येथे डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा
तुळजापूर शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा करुन अभिवादन करण्यात आले. डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक गणेश रोचकरी व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी सहशिक्षक महेंद्र कावरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरजमल शेटे यांनी तर आभार सुज्ञानी गिराम यांनी मानले. यावेळी केरण लोहारे, अंगणवाडीच्या किरण गरडकर, श्रीदेवी पाचंगे, शिवा डाके, नंदा जमदाडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.