धाराशिव (प्रतिनिधी)- 65 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लक्ष रुपयांच्या आत आहे अशा पात्र उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या साहित्यानुसार रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
65 वर्षे पूर्ण पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून चष्मा, श्रवणयंत्र,ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची, नि-ब्रेस,लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर आदी साधने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हा निधी एकरकमी एक वेळच मिळणार आहे. निधी प्रत्येक महिन्यास देण्यात येणार नसून तो केवळ तीन हजार रुपयांच्या मर्यादित एक वेळ एक रकमीच मिळणार आहे. वयोश्री योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दरमहा कोणताही निधी मिळणार नसल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी दिली.