मुरुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे दहावे त्रैवार्षिक अधिवेशन आळंदी येथील फ्रूटवाला धर्मशाळेतील सभागृहामध्ये शुक्रवार20 डिसें ते रविवार ता.22 डिसेंबर दरम्यान संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष मधुसूदन जोशी,यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव,भारतीय मजदूर संघ पश्चिम क्षेत्र प्रभारी सी. व्ही. राजेश,प्रदेशाध्यक्ष अनिल दुमने,महामंत्री किरण मीलगिर, महामंत्री किशोरीलाल रायकवार, महामंत्री अरूण पिवळ, उप महामंत्री प्रशांत भांबुर्डेकर, संघटनमंत्री विजय हिंगमिरे, वरिष्ठ पदाधिकारी सुभाष सावजी यांची उपस्थिती होती. यावेळी या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्राचे वाढते खासगीकरण, कंत्राटी भरती, सौर ऊर्जा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे झालेले त्रिभाजन आदी विषयांवर चर्चा व ठराव घेण्यात आले तसेच, संघटनात्मक कार्यक्रम आणि आगामी तीन वर्षांसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अधिवेशनात तीन दिवसांत एकूण पाच सत्रात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
संजय कुलकर्णी, डॉ.रवींद्र उटगीकर,शंतनु दिक्षित यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर आण्णाजी देसाई निवडणूक अधिकारी यांचे नेमणूक झाल्यावर त्यांचे अधिपत्याखाली तीनही कंपनीतील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. महावितरण केंद्रीय कार्यकारणीत लातूर परिमंडलातून सुधाकर माने यांची निवड संघटनमंत्री पदी झाल्याबद्दल लातूर झोनमधील सर्व पदाधिकाऱ्यांसह सभासदात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर झोन मधील अधिवेशन ला जाण्यासाठी झोनसचिव प्रवीण रत्नपारखी, उपाध्यक्ष नवनाथ बडे यांनी नियोजन केले, या अधिवेशनात लातूर झोनमधील अध्यक्ष बी.टी चव्हाण,विकास गाडेकर,निलेश भिरंगे,अमोल पाटील, शाम आबाचणे, मोहन सूर्यवंशी, सातय्या स्वामी,मोहन गुरव, अनिल कोल्हे, वाय. यु, चव्हाण, राजकुमार पाटील, बालाजी जाधव,सुंदर आजणवतीकर, सुजाता हेंगणे, अनुराधा शिंदे,मोहम्मद लदाफ, सुरज चौधरी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलजी भालेराव यांचे अध्यक्षीय भाषण झाले व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने महाअधिवेशनाचा समारोप झाला. महाराष्ट्रभरातून मुंबई, पुणे, औरंगाबाद,नांदेड, लातूर,धाराशिव, उमरगा अशा परिमंडळातून विविध पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.