धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांनी सत्कार केला. तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी सदिच्छा दिल्या.
व्यापक लोकहितासाठी सदैव कृतिशील असणारे अष्टांगावधानी नेतृत्व म्हणजे ना. देवेंद्र फडणवीस. छत्रपती शिवरायांच्या अजिंक्य महाराष्ट्राने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत आपल्या अजोड नेतृत्वावर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. अगदी शेवटच्या माणसाच्या चेहर्यावरही आज मोठे समाधान झळकत असल्याची प्रतिक्रिया यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष चालुक्य पाटील यांनी व्यक्त केली. या प्रसंगी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, राजेंद्र राऊत, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुनील चव्हाण, सतीश दंडनाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.