धाराशिव -

लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा हत्त्वाचा महामार्ग टेंभुर्णी-लातूर हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी कुर्डूवाडी बार्शी पांगरी धाराशिव जिल्ह्यातील येडशी तडवळा ढोकी व लातूर जिल्ह्यातील मुरुड या मोठ्या बाजारपेठांना जोडणारा व मराठवाडा चे प्रवेशद्वार असलेले बार्शी शहरातून थेट पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क निर्माण करणारा महत्त्वाचा मार्ग आहे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न शेकडो वर्षापासून प्रलंबित होता. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. 29 संप्टेबर 2019 रोजी भेट घेतली होती त्यानंतर दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान प्रश्न क्रमांक 71 द्वारे तारांकित प्रश्न विचारला होता त्यानंतर मार्च 2021 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान  नियम 377 द्वारे लक्षवेधी प्रश्न विचारून सभागृहाचे लक्ष वेधले होते. दिनांक एप्रिल 2021 रोजी निवासस्थानी भेट घेऊन सदर प्रश्न संदर्भात चर्चा केली होती.

          दिनांक ऑक्टोबर 2021 रोजी संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच 21 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माना श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समवेत झालेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत सदर प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली होती. दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान माननीय नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सदर विषयाच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात आला होता. दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी माननीय मंत्री महोदय यांच्या निवासस्थानी या प्रश्नाच्या अनुषंगाने भेट घेतली व सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत पाठपुरावा केला होता तसेच लोकसभेत लोकसभेचा सदस्य या नात्याने विविध आयुधाचा वापर करत संबंधित प्रश्नाकडे सभागृहाचे वारंवार लक्ष वेधले होते तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून व तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून अनेक वेळा या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भाने पाठपुरावा केला होता. चालू शेवाळे अधिवेशना दरम्यान खासदार महोदयांनी प्रश्न उत्तराच्या तासांमध्ये माननीय नितीनजी गडकरी यांना सोलापूर- उमरगा रामा 61, धुळे -सोलापूर रामा211, नागपूर -रत्नागिरी रामा 361 सह टेंभुर्णी-लातूर या मार्गाच्या संदर्भाने प्रश्न विचारले होते.

 

           लोकसभेच्या अधिवेशन काळात मा. नितीनजी गडकरी यांनी खासदार महोदय यांना प्रत्यक्ष भेटण्यासंदर्भात सांगितले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या महामार्गाच्या अनुषंगाने काल गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी भेटीदरम्यान समक्ष चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी सदर महामार्गास 574 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्याच्या फेसबुक पेज वर कळविले आहे. सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,प्रकल्प संचालक नांदेड यांच्याकडे विविध बैठकीदरम्यान सदर महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याकरिता आढावा घेण्यात आला होता. टेंभुर्णी लातूर चौपदरीकरण संघर्ष समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले होते तसेच या समितीच्या वतीने नागपुर येथे आमरण उपोषण करण्यात आले होते या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सदर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

         यामुळे शिक्षणासाठी व मोठी बाजारपेठ असलेल्या लातूर शहराशी व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहराशी थेट संपर्क होण्यास व दळणवळण दरम्यान होणारा विलंब या सर्व समस्यांचा निपटारा होणार असून या महामार्गाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांचा कमी वेळेत व जलद गतीने संपर्क स्थापित होणार आहे.

 
Top