कळंब (प्रतिनिधी)- अनंत श्री विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम, ता. जि. रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळा कार्यक्रम तसेच समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दि. १६ व १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता, श्रीक्षेत्र माऊली माहेर, सिमूरगव्हाण, ता. पाथरी, जि.परभणी या ठिकाणी संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केली जातात. दि. १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती वारी उत्सवात संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत आदिवासी आश्रम शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ब्लंकेट, शालेय दफ्तर, वह्या, कंपास वाटप केले जाणार आहे. संस्थानाच्या Blood In Need उपक्रमांतर्गत ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या रुग्णांना त्या हॉस्पिटल येथे जाऊन आजपर्यंत २०,००० रुग्णांना रक्त देऊन प्राण वाचवले आहेत. तसेच संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ६८ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले आहेत. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर ५३ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत असून आतापर्यंत २५,४०० हून अधिक जखमींचे प्राण वाचण्यात यश आले आहे.
दिनांक १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त तसेच १६ व १७ डिसेंबर २०२४ या दिवशी जमदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अध्यात्मिक अमृततुल्य प्रवचन होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाड्यातील सर्व भाविक भक्तांनी या दत्त जयंती वारी उत्सवाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन उपपीठ मराठवाडा, सिमुर गव्हाण, यांच्या वतीने केले आहे.