धाराशिव (प्रतिनिधी)- कंत्राटदार व धनगर चळवळीतील संतोष कोंडोंबा वतने यांच्या मातोश्री चंद्रकला कोंडीबा वतने वय 73 यांचे गुरूवार दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता ज्ञानेश्वर नगर धाराशिव येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार शुक्रवार दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वार धाराशिव येथील कपिलधार स्मशनभूमीत करण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्यासह सर्वस्तरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. चंद्रकला वतने यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील व्यापारी ज्ञानेश्वर वैद्य यांच्या त्या भगिणी होत्या. वतने यांच्या दुःखात पु.वि. लोकराज्य परिवार सहभागी आहे.