धाराशिव (प्रतिनिधी)- तळेगाव दिघे येथे काँग्रेस युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे जेष्ठ ना. बाळासाहेब थोरात , माजी मंत्री अमित भैय्या देशमुख, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, माजी आ. डॉ सुधीर तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष मलंग शेख यांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.
त्यांच्यासोबत निलेगावचे उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष मोहसीन इनामदार, ग्राम पंचायत सदस्य अजित दादा गटाचे तुळजापुर तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग अब्बास पटेल, ऍड खमर शेख, समीर मुळे, नोमान मौजन यांचा प्रवेश करण्यात आला. युवा निर्धार मेळावा जिल्हाभर फिरून यशस्वी केलेल्या रणरागिणी जयश्री ताई थोरात, आमदार सत्यजित तांबे, हाय कोर्टाचे नामवंत वकील मंगेश देशमुख, ऍड जावेद शेख आदीचे सत्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेशाने काँग्रेस पक्षाची ताकत वाढली असून त्यांची समाजावर मजबूत पकड असून इतर समाज युवकांचा दांडगा जनसंपर्क असल्याने काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.