धाराशिव (प्रतिनिधी)- मागील भांडणाच्या कारणावरून सांजा शिवारात एकास पस्तीस वर्षीय तरूणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.या प्रकरणी आरोपी असलेल्या एका महिलेवर व एका पुरूषावर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी शाहुराज दिगंबर तिर्थकर, शंकुतला नामदेव माळी (दोघे रा. व्ही. जे. शिंदे कॉलेजच्या पाठीमागे, वरूडा रोड, सांजा शिवार ता. जि. धाराशिव) यांनी दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास व्ही. जे. शिंदे कॉलेजच्या पाठीमागे वरूडा रोड सांजा शिवार येथे सागर शाहुराज तिर्थकर (वय 35 वर्षे, रा. रूईभर, ता. जि. धाराशिव) यांना मागील भांडणाच्या कारणावरून हातपाय बांधून लाकडी काठीने बेदम मारहाण केली. तसेच डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. फिर्यादी धनश्री सागर तिर्थकर (वय 32 वर्षे, रा. रूईभर ता. जि. धाराशिव) यांनी दि. 11 नोव्हेंबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून आनंदनगर पोलिस ठाणे येथे भा.दं. वि. सं. कलम 103 (1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.