धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 'संविधान दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. डॉ. गणेश शिंदे यांनी राज्यघटना उद्देशिकेचे वाचन केले. उद्देशिका सामुदायिक वाचनात सर्वांनी सहभाग घेतला. संविधान दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीपासून विज्ञान भवन - प्रशासकीय इमारतीपर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले. या समारंभास विद्यापीठ उपपरिसरातील विविध विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.