धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, अकॅडमीक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते, डॉ प्रशांत कोल्हे,डॉ. उषा वडणे, प्रा .सुनीता गुंजाळ प्रा.सुजाता गायकवाड ,प्रा आरती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.माने  म्हणाले की  भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले असून  आपल्यासाठी हा दिवस आनंदाचा आहे .हा दिवस सुवर्ण अक्षराने भारताच्या इतिहासात लिहिला गेलेला आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी माहिती करून त्याविषयी आपल्या मनात नितांत आदर आणि प्रेम असले पाहिजे .

यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनीता गुंजाळ  संविधानाविषयी बोलताना म्हणाल्या की , संविधानामुळे देशाची राज्यघटना तयार झाली असून भारतातील विविध धर्म ,जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. या राज्यघटनेने आपल्या प्रत्येकाला आपले मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांमधून अक्षय माळी ,वर्षा पाटील , वैष्णवी उबाळे यांनी संविधानाविषयी महत्त्व आपल्या विचारातून व्यक्त केले.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करून शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top