धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त व भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव, भारतीय संविधान अमृतमहोत्सव समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. रॅलीत वाणेवाडी येथील नारायण बाबा वारकरी शाळेतील विद्यार्थ्यांचे व संविधान रथाचे प्रमुख आकर्षण होते.
रॅलीची सुरुवात उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प व संविधान उद्देशिका, विश्लेषण प्रत देऊन करण्यात आले. मान्यवरांनी आपापल्या मनोगतातुन संविधाना विषयी माहिती दिली. या रॅलीत समता माध्यमिक विद्यालय धाराशिव, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, आर्य चाणक्य हायस्कुल,शासकीय नर्सिंग कॉलेज, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, के.टी पाटील नर्सिंग कॉलेज, नविन नर्सिंग कॉलेज, शिवाजीराव घोगरे नर्सिंग कॉलेज, सह इतर शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅली मार्गावरील ठिकठिकाणी चौकात नागरिकांनी रॅलीचे स्वागत फटाके वाजवून केले. नामदेव वाघमारे, जॉन मलेलु चर्च, युवा भिम शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव भोसले, व्यापारी महासंघाचे लक्ष्मीकांत जाधव, संजय मंत्री, युनिक बहु.सामाजिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष आनंद भालेराव व इतरांनी रॅलीत सहभागी होऊन पाणी व बिस्कीट, केळीची व्यवस्था केली. अमर आगळे यांनी भारतीय संविधान उद्देशिका मराठी व उर्दू भाषेतील वाटप केले. संविधान रथ राणा बनसोडे, संविधान बॅनर मृत्युंजय बनसोडे, आनंद बनसोडे, देवानंद एडके, तर कपिल थोरात, रांगोळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विभाग धाराशिव, महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार, नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता, महापुरुषांच्या उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, मैंदर्गी, सांगळे, सामाजिक चळवळीतील माया पानसे, कल्पना पवार, अस्मिता कांबळे, सिनेट सदस्य देविदास पाठक, साहित्यिक इतिहासकार युवराज नळे,सिजोद्दिन शेख,कानिफनाथ देवकुळे,नंदकुमार गवारे,जानवाडकर,विस्तार अधिकारी भारत देवगुडे,गटविकास अधिकारी आनंद पाटील, स्वातंत्र्य सेनानी बुबा जाधव,रमाकांत गायकवाड,राजरत्न शिंगाडे,ॲड.इंद्रजीत शिंदे,ॲड.जकाते,ॲड.ज्योती बडेकर,ॲड.अरुणा गवई,दलभंजन मॅडम,अन्य सह विविध सामाजिक संस्था शाळा कॉलेज,सामाजिक कार्यकर्ते,पक्ष पार्टी उपस्थित होते,तर आशा ताई कांबळे या दिव्यांग भगिनी हातात भारतीय संविधान ग्रंथ घेऊन सामिल होत्या,मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम डी देशमुख,सचिव अब्दुल लतिफ,कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,उपाध्यक्ष सचिन चौधरी,सहसचिव बाबासाहेब गुळीग,कोषाध्यक्ष रऊफ शेख,विशाल घरबुडवे,अमर आगळे,युसुफ सय्यद,राजेंद्र धावारे,आयुष वाघमारे,रोहित गाडे,विनायक शिंदे,राजसिन्हा भैय्या निंबाळकर,सुनिल ढगे, सुधाकर माळाळे,राहुल राऊत,श्रीकांत गायकवाड,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,सपकाळ,बप्पा शिंदे,अतुल लष्करे,शशी माने,शिवलिंग लोंढे,पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,समाज कल्याण विभाग,अधिकारी कर्मचारी,मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रॅलीची सुरुवात बार्शी नाका जिजाऊ चौक येथुन सुरुवात झाली. समारोप फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.अजय वाघाळे तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.