तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनेच्या यशामुळे महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता आल्या आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच राहावेत, असे साकडे तुळजापुरात श्री तुळजाभवानी चरणी साकडे घालण्यात आले आहे, अशी भावना शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.
तुळजापूर येथील मंदिरात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावेत यासाठी महापूजा करण्यात आली. यावेळी राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी राहावेत, असे साकडे आई तुळजाभवानी चरणी घातले. याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, माजी नगरसेविका मंगला कोल्हे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस करून उठाव केला. त्यामुळेच आज महायुती निर्माण झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनेच्या यशामुळे महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ तीन तास झोप घेतली. उर्वरित वेळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिला. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला सामोरे गेले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यासह विविध योजना राबविण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यामुळे लोकप्रिय असे मुख्यमंत्री ते ठरले आहेत. खऱ्या अर्थाने सध्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावेत अशी राज्यभरातील अनेक लाडक्या बहिणी आणि विविध घटकांची इच्छा आहे.
बिहार पॅटर्न प्रमाणे त्यांना पुन्हा संधी द्यावी, असे साकडे श्री तुळजाभवानी चरणी घालण्यात आले आहे. अशी भावना शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसैनिक स्वप्निल कांबळे, जवाहर जाजू, भीमा वाघमारे, गणेश तूपदोळे, भैया माने, भूमिका तुपदोळे, श्वेता किंदगिरी, लक्ष्मी म्हेत्रे यांच्यासह सोलापूर व तुळजापुरातील सुमारे 500 अधिक लाडक्या बहिणींची उपस्थिती होती.
बिहार पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा संधी द्यावी
बिहार पॅटर्न प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी द्यावी. खऱ्या अर्थाने सध्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावेत अशी राज्यभरातील अनेक लाडक्या बहिणी आणि विविध घटकांची इच्छा आहे. असेही शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले.