भूम (प्रतिनिधी)- भूम केंद्रप्रमुख पुष्पा विनायक वाघमारे (मस्के ) यांची सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा येथील यश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता . पुष्पा वाघमारे यांनी शिक्षिकापदी ३८ वर्षे सेवा पुर्ण करुण सेवानिवृत्ती झाली आहे . २००८ ते २०२४ मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले आहे .सेवानिवृत्तीच्या वेळेस त्यांनी पाथरूड व आंबी येथे केंद्रप्रमुख म्हणून काम केले आहे .यावेळी डॉ .निलेश मस्के,अनुराधा देवळे रुपाली मस्के उषा करंडे संगीता भांडवले,आचार्य धंम्मानंद महाठेराव आर्याजी रूपनंदा शिक्षण अधिकारी राहुल भट्टी, पथरुड मुख्याध्यापक, अहमद शेख, मु सुरवसे अंभि भोसले सर, सोमनाथ टकले विस्तार अधिकारी,साळुंखे तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मित्र परिवार स्नेही उपस्थीत होते.