धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहराचे ग्रामदैवत श्री कपालेश्वर मंदिरात दिपावली सणानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिक शुध्द त्रिपुरारी पौर्णिमेचा दिपोत्सव असंख्य शहरवासियांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शुक्रवारी दि. 15 नोव्हेंबर रोजी रात्री पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री 10 वाजता अभिषेकला प्रारंभ होवून 12 वाजता आरती होते.
त्यानिमित्ताने रामकृष्ण हरी सत्संग मंडख व पू. सेलूकर महाराज शिष्य परिवारामार्फत सामुदायिक श्रीसूक्त, हवन संपन्न झाले. यामध्ये पंचाहत्तर भाविक सहभागी झाले. यावेळी शामराव दहिटणकर, नंदकुमार ठाकरे, बंडोपंत जोशी, उल्हास शहापूरे, सोनसळे, आर. एस. कुलकर्णी, कुमार व्यास, मनिषा गोवर्धन इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.