तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांची तुळजापूर शहरात आशिर्वाद रॅली काढण्यात आली. महायुती मध्ये आरपीआयचे रामदास आठवले यांचा पक्ष आहे.मात्र महायुतीच्या बॅनर आणि पोस्टरवर रामदास आठवले यांचा फोटो दिसून आला नाही. दलितांची मतं चालतात मग दलित नेत्यांचे फोटो का नाहीत. असा सवाल कॉग्रेसचे अमोल कुतवळ यांनी उपस्थित केला आहे.
दुसरें म्हणजे सर्वच महापुरुषांच्या जयंतीला डॉल्बीच्या कर्कश आवाजावर बंदी असते.तुळजापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ आहे.दिपावली सुट्टी असल्याने अनेक राज्यांतील भाविक भक्त श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूर शहर व परिसरात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असा ठिकाणी वाहनांच्या पार्किंगचा सतत प्रश्न निर्माण होतो. तरीही दिनांक 10/11/2024 रोजी महायुती कडून गर्दी च्या शहरात रॅली काढली तसेच कर्कश आवाजात डॉल्बी अंदाजे पाच तास वाजत होता.संबंधित प्रशासन ह्या सर्व प्रकारला परवानगी कोणत्या नियमानुसार देऊ शकतात.हे गुलदस्त्यात आहे.असेही नागरिकांतून चर्चा होत आहे.