तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा महाविकास आघाडीचे अधीकृत उमेदवार अँड.कुलदिप धिरज कदम पाटील व पदाधिकाऱ्यांनी शिंगोली, जहागीरदारवाडी, ताकवीकी, तोरंबा, पाटोदा, वडाळा, बरमगा, नांदुर्गा, करजखेडा, गोगाव, भंडारी, ककासपूर या गावात गावभेट दौरे करून, कार्नर सभा घेऊन, जोरदारपणे महायुती सरकारवर टिका केली.
ते म्हणाले की मी प्रत्यक्ष तुळजापूरमध्ये रहातो. 24 तासात कधीही कामानिमित्त, अडी-अडचणीत हक्काने येऊन कामं सांगु शकता. विरोधक महायुती आमदाराचे घर धाराशिवमध्ये असते. तेथे जनतेला आवर्जून आपली कामे, धंधा सोडून जावे लागेल. असा आरोप करून. येत्या 20 तारखेला हाताच्या चिंन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतानी निवडून द्यावे असे आवाहन करून, वडीलधा-या मंडळीचे आशीर्वाद घेतले. दि.11 सोमवारी सकाळी कसई गावचे ग्रांमपंचायत सदस्य व भाजपाचे नेते परमेश्वर अशोक म्हमाणे व त्याच्यां सोबत आलेल्या कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचा गमजा घालून धिरज पाटील यांनी स्वागत केले. या वेळी युवा नेते ऋषी मगर, जनसेवक अमोल कुतवळ व पदाधिकारी उपस्थित होते.