मारहाण

वाशी (प्रतिनिधी)- आरोपी नामे-रमाकांत प्रभाकर सानप, उमाकांत प्रभाकर सानप, मच्छिंद्र शिवाजी सारुक सर्व रा. नांदगाव ता. वाशी  जि. धाराशिव यांनी दि.09.11.2024 रोजी 09.30 वा. सु. नांदगाव येथे रमाकांत सानप यांचे घरी फिर्यादी नामे- सुशांत सुनिल पवार, वय 25 वर्षे, रा. बोरी जि. धाराशिव यांना गावामध्ये ट्रॅक्टर चालविण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, लोखंडी गज, लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुशांत पवार यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 109,352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाणे- आरोपी नामे-आविनाश पारडे, कैलास पारडे, कुमार लोंढे, समाधान लोंढे, प्रदीप सातपुते, सुनिता पारडे, सविता पारडे, परमेश्वर पारडे, महादेवी लोंढे, ममता लोंढे, शितल सातपुते, वनिता लोंढे, विद्या पाडोळे, महादेवी सातपुते, सायली राउत जि. धाराशिव यांनी दि.11.11.2024 रोजी 12.30 वा. सु.आण्णा भाउ साठेनगर येथे फिर्यादी नामे-नंदा राजेश देडे, वय 27 वर्षे, रा. आण्णा भउ साठे नगर ता. जि. धाराशिव यांना मागली भांडाणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्ती, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नंदा देडे यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 189(2),191(2),191(3), 190,118(1),115(2),352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मालमत्तेविरुध्द गुन्हे

नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अंकुश मल्हारी लोखंडे, वय 56 वर्षे,रा.जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अणदुर शिवारातील सौर उर्जा प्लॅन्ट वरील 5,500 मिटर वायर व 540 कनेक्टर एकुण 37,500 किंमतीचे साहित्या दि.29.10.2024 रोजी 24.00 ते दि.30.10.2024 रोजी 07.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अंकुश लोखंडे यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-महावीर ज्ञनोबा जैन, वय 51 वर्षे,रा.माण्केश्वर ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000 किंमतीच्या 2 म्हशी या 29.10.2024 रोजी रात्री 09.00 ते दि. 30.10.2024 रोजी 05.00  वा. सु. माण्केश्वर शिवारातील शेत गट नं 1033 मधील गोठ्यातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महावीर जैन यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बाळसाहेब बब्रुवान काळे, वय 46 वर्षे,रा. तिर्थ खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा बारुळ शिवारातील शेत गट नं 445 येथील तळ्यामधील पाणबुडी मोटार अंदाजे 15,000 किंमतीची ही दि.08.11.2024 रोजी 16.00 ते दि.09.11.2024 रोजी 09.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळासाहेब काळे यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


रस्ता अपघात

उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-सचिन लक्ष्मण काळे, वय 33 वर्षे, रा. वडगाव देव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.04.11.2024 रोजी 23.30 वा. सु.मोटरसायकलवरुन गुगळगाव येथुन लक्ष्मीपाटीकडे जात होते. दरम्यान कोरेगावाडी पाटी  लक्ष्मीपाटी जाणारे रोडवर नागनाथ कुंभर यांचे विटभट्टी जवळ आयशर टेम्पो क्र एमएच 20 डी ई 8186 चा चालक आरोपी नामे-सलमान खाला पठाण, रा. सोमठाना ता. माजलगाव जि. बीड यांनी त्याचे ताब्यातील टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे नादुरुस्त अवस्तेत रोडचे मध्यभागी कसलाही इंडीकेटर किंवा ईशारा न लावता उभ केल्याने सचिन काळे यांची मोटरसायकल ही टॅम्पोला पाठीमागून धडकून गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत लक्ष्मण काळे, वय 35 वर्षे, रा. वडगाव देव ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम  106(1)  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-प्रकाश शंकरराव बावणे, वय 64 वर्षे, रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.21.10.2024 रोजी 20.00 वा. सु.मोटरसायकल क्र एमएच 12 एस.आर. 5813 वरुन आढाळा हासेगाव येरमाळा कळंब कडे येत होते. दरम्यान लावंड यांचे शॉपींग सेंटर समोर येरमाळा ते कळंब रोडवर कळंब येथे ट्रॅक्टर क्र एमएच 45 एफ 8671 चा चालकाने त्याच्या ताब्यातील टॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे प्रकाश बावणे यांचे मोटरसायकल समोरुन धडक दिली. या अपघातात प्रकाश बावणे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रवीण प्रकाश बावणे, वय 40 वर्षे, रा. आढाळा कळंब जि.धाराशिव यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम  106(1), 281, 125(ए), 125(बी) सह कलम 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-गणो खंडाप्पा पुजारी, वय 40 वर्षे, रा. खजुरी बॉर्डर ता. आळंद जि.कलबुर्गी हे दि.09.11.2024 रोजी 23.00 वा. सु.मोटरसायकल क्र एमएच 03 ए.यु. 3930 वरुन गुंजोटी शिवारात चौरस्ता उमरगा ते आळंद जाणारे रोडवरुन जात होते. दरम्यान भुसणी पाटीच्या पुढे थोडे अंतरावर कार क्र एमएच 25 टी 1016 चा चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे गणो पुजारी यांचे मोटरसायकल समोरुन धडक दिली. या अपघातात गणो पुजारी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मल्लीकार्जुन खंडाप्पा पुजारी, वय 58 वर्षे, रा. खजुरी बॉर्डर ता. आळंद जि.कलबुर्गी यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम  106(1), 341, 125(ए), 125(बी) सह कलम 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिव (प्रतिनिधी)- फिर्यादी नामे-स्वप्नील संजय मोहिते, वय 28 वर्षे,रा.गणेश नगर धाराशिव ता.  जि. धाराशिव हे दि. 02.11.2024 रोजी 18.29 ते दि. 06.11.2024 रोजी 19.30 वा. सु. त्यांचे राहते घरी असताना  मोबाईल क्रंमाक 8882184682 वरुन स्वप्नील मोहिते यांचे मोबाईलवर फोन करुन खोटे अमिष दाखवून स्वप्नील मोहिते यांचे बॅक खाते क्र 163701506802 वर बनावट इंन्सुरन्स करुन ओटीपी घेवून ऑनलाईन एकुण 18,79,000 काढून घेवून सृवपृनील मोहिते यांचे फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-स्वप्नील मोहिते यांनी दि.11.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(1) सह कलम 66(सी),66(डी) महिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top