उमरगा (प्रतिनिधी)- आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकास कामाला प्रभावित होऊन उमरगा-लोहारा तालुक्यातील कोळी महादेव समाजाच्या वतीने उमरगा येथील शांताई मंगल कार्यालय येथे कोळी महादेव समाजाच्या वतीने रविवार दि.10 रोजी उमरगा येथे समाजाचा भव्य मेळावा घेऊन 240 उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी सकल कोळी महादेव समाज मराठवाडा अध्यक्ष चंद्रहर्ष नलमले, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, महादेव पिटले, ज्ञानेश्वर पालमपल्ले, हणमंत गुंडे, हणमंत पालमपल्ले, चंद्रकांत जोगे, किरण जमादार, महादेव सलके, शिवशंकर फुले, मनोज भाले, सचिन जमादार, विरेश जमादार, रमेश जोगे शंकर घंटे अब्बास घंटे दत्ता, जमादार, मुन्ना कोळी लोहारा प्रभाकर घाटे, संगिता पालमंपल्ले, सुरेश जमादार, ज्ञानेश्वर जमादार यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील महादेव कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कोळी महादेव समाजाच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले की, आपले प्रेम आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता आजवर केलेल्या कामाची मला पोचपावती मिळाली आहे. आपण जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास मी सार्थक करेन. कार्यक्रमास युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, माजी जि.प.सदस्य किरण गायकवाड उपस्थित होते.