उमरगा (प्रतिनिधी)- गेले 15 वर्षे आमदार म्हणून काम करताना मी मतदार संघाचा विकास करण्यावरच भर दिला. मतदार संघ शांतता कसा राहील हे पाहिले. महायुती सरकारच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण, मागेल त्याला सौरपंप, शेतीपंपाची वीजबिल माफी आणि शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान योजना हे महायुती सरकारचे काम शेतकरी हिताचे आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. शिवसेना व महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारानिमित्त कंटेकुर (ता. उमरगा) येथे आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती हरीश डावरे, माजी सभापती दिलीपसिंह गौतम, शेखर मुद्कना, सरपंच विजयाबाई जमादार, उपसरपंच कमलाबाई धुमाळ,उपजिल्हाप्रमुख भगत माळी, माजी सरपंच विलास व्हटकर तालुकाप्रमुख शेखर पाटील,विभाग प्रमुख जागृत शिंदे, पांडुरंग धुमाळ, महादेवी कुंभार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राची प्रगती ही अशाच वेगवान पद्धतीने होत रहावी यासाठी महायुती सरकार असणं गरजेचं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती केली.
याप्रसंगी माजी सभापती यांनी लातूर पॅटर्न संदर्भात जोरदार प्रहार केला. उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या लोकांनीच उमरगा विधानसभा लढवावी. माजी सभापती जितेंद्र शिंदे यांनी विरोधी उमेदवार जोरदार टीका केली. काल नोकरीचा राजीनामा देऊन आज विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांचे राजकीय काम शून्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभव नसलेल्या व्यक्तींनी जनतेचा प्रश्न कसा कळणार. सर्वाधिक निधी आल्यामुळे आमदार ज्ञानराज चौगुले या काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी शिवाजी जमादार, पांडुरंग धुमाळ, धनराज स्वामी, वैभव बिराजदार, रवींद्र विभुते, संतोष जमादार, महादेव गायकवाड, बालाजी दासे, बालाजी ठेके, सचिन पाटील, रावण मुडगे ,गोविंद धुमाळ, शिवा कांबळे, अनंतराव बिराजदार, नामदेव गायकवाड आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.