धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मेहता इंजिनिअरिंग कंपनी चे मालक शैलेश वसंतकुमार मेहता यांचे निधन दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1 :20 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय - 64 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, पुतणे 3 व भावजई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.