नळदुर्ग (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने नळदुर्ग, अणदुर व जळकोट येथे रूट मार्च काढण्यात आला.
विधानसभा निवडणुक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस विभागाकडुन दक्षता घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश राहावा. यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग, अणदुर आणि जळकोट येथे पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये बीएसएफचे जवान तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. नळदुर्ग शहरातील प्रमुख मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला.