धाराशिव (प्रतिनिधी) -  जिल्हा पर्यटन विकास समिती व पुरातत्व विभागाच्यावतीने 24 नोव्हेंबर रोजी धाराशिव शहरालगत वैराग रोडवर धाराशिवचा प्राचीन वारसा असलेली चामर लेणी येथे 19 ते 24 नोव्हेंबर जागतिक वारसा सप्ताह निमित्त चामर लेणी हेरीटेज वॉक करण्यात आला. 

 या प्रसंगी जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी चामर लेणीची माहिती सांगत असताना इतका महत्वाचा वैभवशाली वारसा सध्या अतिक्रमणाच्या व घाणीच्या विळख्यात न जाता  मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचे सांगितले. पुरातत्त्व विभागाच्यावतीने इथे जतन व संवर्धन करण्यासाठी तात्काळ योजना आखावी. यासाठी आपण पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने पाठपुरावा करत असल्याचेही पर्यटन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सांगितले. चामर लेणी पासून जवळच असलेल्या जुणी गल्ली येथील पुरातन गढीचीही पाहणी करण्यात आली. या हेरिटेज वॉक करिता मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. शीला स्वामी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनीही पुरातत्त्व स्थळांचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी पर्यटन समितीचे पदाधिकारी प्रा अभिमान हंगरगेकर, अब्दुल लतीफ, गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष बाबा गुळीग, जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, विजय गायकवाड, शेषनाथ वाघ, राजाभाऊ परदेशी, ॲड विक्रम साळुंके, बालाजी जाधव, सतीश जाधव, अर्जुन सुरवसे, प्रदीप पांढरे, सत्यहरी वाघ, युसुफ शेख, विनोद कुलकर्णी, प्रभाकर बनसोडे, गोविंद वारे इत्यादी उपस्थित होते. आभार जिल्हा पर्यटन समिती सचिव देविदास पाठक यांनी मानले.

 
Top