तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे 25 नोव्हेंबरला पंढरपूरहून तेर येथे आगमन होताच भाविक भक्त यांनी अभूतपूर्व स्वागत केले. तसेच ग्रामसेवा संघाच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला.
3 नोव्हेंबरला श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला कार्तिक सोहळ्यानिमित्त तेरहून पंढरपूरला प्रस्थान झाले. कार्तिक सोहळा करून श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे 25 नोव्हेंबरला सायंकाळी तेर येथे आगमन होताच भाविक भक्त यांनी अभूतपूर्व पालखीचे स्वागत केले. रस्तावर जागोजागी सडा टाकून सुशोभित रांगोळी काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत, वाजत-गाजत पालखीचे स्वागत केले. श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी तेर व परिसरातील भाविक भक्त यांनी गर्दी केली होती.
दिपोत्सव साजरा
दिपोत्सवाचा शुभारंभ हभप दिपक महाराज खरात, पद्माकर फंड, विजयकुमार लाड, बालाजी भक्ते याच्या हस्ते करण्यात आला. दिपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी तेर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून तेर येथील ग्रामसेवा संघाच्यावतीने श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरहून तेर येथे आगमण होताच श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिराजवळील तेरणा नदीच्या दगडी घाटावर पाच हजार दिवे लावून दिपोत्सव साजरा केला जातो. दिपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने भाविक भक्त यांनी गर्दी केली होती.