तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी मनोज जरांगे पाटील ज्या उमेदवारास मतदान करा असा आदेश देतील त्या उमेदवाराला मराठा समाज मतदान करेल असा निर्णय मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाचा झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा बांधवांना निवडणूक संदर्भात चर्चासत्र आयोजित केले होते. कोणाला मतदान करायचे, कोणाला पाडायचे यावर मराठा समाज बांधवांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना काही मराठा बांधव म्हणाले कि, मराठा उमेदवार मोठ्या संखेने आहेत. दोघात एकमत होणे अशक्य आहे. मनोज पाटील यांचा आदेशाने समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी यांना 100 रुपये बाँन्डवर मराठा आरक्षण बाबतीत आवाज उठवणार हे लिहुन दिले आहे. एक मराठा पाडा व दुसरा निवडुन आणा. या बाबतीत निर्णय घेणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर सर्वानुमते असे ठरले की मनोज जरांगे पाटील तुळजापूर विधानसभा उमेदवार बाबतीत जो निर्णय घेतील त्याचे तंतोतंत पालन करण्याचे ठरले. यावेळी मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होते.