परंडा (प्रतिनिधी) - भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान म्हणजे कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्माचा विचार करून अनेक देशाचे संविधान वाचून भारतीय संविधान  सविस्तरपणे लिहिले असे प्रतिपादन प्रा. उत्तम कोकाटे यांनी केले. येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान दिन साजरा करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव उपस्थित होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अमर गोरे पाटील यांची उपस्थिती होती. 

यावेळी प्रा. उत्तम कोकाटे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय संविधानाची प्रास्ताविका ही संपूर्ण संविधानाची उद्देशिका आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत व शेवटी हे संविधान अंगीकृत करत आहोत. या दोनच शब्द संपूर्ण भारतीय संविधानाची ओळख निर्माण होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले.

 
Top