तुळजापूर (प्रतिनिधी) - लोकसभे नंतर धाराशीव जिल्हयात मनोज जरांगे फँक्टरचा लाभ महाविकास आघाडी उमेदवारांना झाल्याचे निकाल व पडलेल्या मतदानावरुन दिसुन येते.

धाराशिव जिल्हयात चार विधानसभा मतदार संघाच्या जागा असुन त्यात  धाराशिव- कळंब, भूम- परांडा-वाशी, उमरगा- लोहारा येथे महाविकास आघाडी उमेदवार मनोज जरांगे फॅक्टर चालल्याने विजयी झाल्याचा दावा राजकिय जाणकार मधुन व्यक्त केला जात आहे. सर्वाधिक मनोज जरांगे पाटील फॅक्टर भूम-परांडा-वाशी, उमरगा-लोहारा येथे मोठ्या प्रमाणात चालल्याचे बोलले जाते. तर धाराशिव-कळंब, तुळजापूर विधानसभा मतदार संघात मनोज जरांगे फॅक्टरचा लाभ महाविकास आघाडीचे उमेदवार  शिवसेना उबाटा कैलास पाटील यांना मिळाल्याचे बोलले जाते. तर तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन महायुतीचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील विजयी झाले असले तरी  ॲड धिरज पाटील मागे मनोज जरांगे फॅक्टरमधील मतदार उभा राहिल्याचे त्यांना पडलेल्या मतदानावरुन दिसुन येते. विशेषता ग्रामीण भागातील मराठा ॲड. धिरज पाटलांच्या मागे राहिल्यानेच मराठा -मुस्लीम मतांचा मिळाल्याने ते 95 हजार मताचा जवळ पोहचले. जरांगे फँक्टर नसता तर  अँड धिरज पाटील यांचा मोठा मताने पराभव झाला असता. विधानसभा तुळजापूर मतदार संघातुन महाविकास आघाडीतील काँग्रेसकडुन प्रथमच अँड. धिरज पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. पहिल्याच विधानसभा प्रयत्नात ऐवढे मते घेणे ही लहानसहान गोष्टी नाही हे दिसुन येते. 

तुळजापूर विधानसभा मतदार संघात लोकसभेला मनोज जरांगे पाटील प्रचंड चालल्याने शिवसेना उबाटा उमेदवार ओमराजे निंबाळकरांना तब्बल 52 हजारचा वर मताधिक्य मिळुन महाविकास आघाडी खासदार जिल्हयाला मिळाला. मनोज जरांगे फॅक्टर जिल्हयात चालला नंतर शहराचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील मनोज जरांगे ़फॅक्टर चालला. मनोज जरांगे फँक्टर लोकसभा नंतर विधानसभा चालला आता स्थानिक स्वराज्य संस्येत चालेल का या ! बाबतीत सध्या सर्वञ जोरदार चर्चा होत आहे.

 
Top