धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी वरील उद्गार काढले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ. हंगरगेकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचा आदर्श सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे. राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशवंतरावजी चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास महाराष्ट्राची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.सावता फुलसागर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. केशव क्षीरसागर, प्रा. माधव उगिले, डॉ. डी.एम. शिंदे, डॉ.सी.एस. महाडिक आदींसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.