धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी संविधान दिनाच्या सर्व उपस्थित विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्राचार्य यांच्या सह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी -विद्यार्थिनी, राष्ट्रीय क्षात्र सेनेचे कॅडेट्स , राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.