तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे घट्टेवाडी येथे पोटच्या मुलाला व मुलीला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राधिका गणेश घट्टे (वय 25 वर्ष) हिने श्रेया गणेश घट्टे (वय 2 वर्ष) व श्रेयस गणेश घट्टे वय (4 महिने) या बालकांना घरातील वेगवेगळ्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडविले व स्वतः घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत राधिका हिच्या दिराने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नळदुर्ग येथील आरोग्य केंद्रात तिघांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. दि.25 रोजी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घट्टेवाडी येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने घट्टेवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Top