भूम (प्रतिनिधी)-  परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये महायुतीचे आरोग्य मंत्री प्रा डॉ .तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे राहुल मोटे वगळता 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या निवडणुकीत महायुतीचे  उमेदवार आरोग्य मंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 मतदान घेऊन सावंत विजय झाला आहे. 9 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज दल आर्यन राजे शिंदे 602,समाजवादी पार्टी ॲड . रेवण भोसले 167, बहुजन महापार्टी शहाजहान पैगंबर शेख 117 व  सहा अपक्षांचा समावेश आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांना 12698, रासपाचे डॉ. राहुल घुले यांना 2170, तर अपक्ष जमीलखा महेबूब पठाण उमेदवार यांचे चिन्ह ट्रम्पेट आहे. यांना 4446 मतदान पडले आहे. 

परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 लाख 30 हजार 773 मतदार आहेत. यामध्ये दोन लाख 33 हजार 715 मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 2019 च्या तुलनेत टक्क्यांनी मतदानात वाढ झाली. यंदा मतदानाची सरासरी 69 . 83 टक्के झाले आहे. त्यामुळे एकूण झालेल्या मतदानाच्या एक साष्टांकप्रमाणे उमेदवाराला डिपॉझिट वाचवण्यासाठी 38 हजार 838 मनदान मिळाणे अपेक्षित होते. मात्र महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता इतर प्रादेशिक पक्षासह अपक्षांना हा मताचा आकडा गाठता आला नाही. यामध्ये महादेव लोखंडे बहुजन समाज पार्टी 856, राजेंद्र गपाट मनसे 843, आर्यन राजे शिंदे राष्ट्रीय समाज दल (आर) 602, ॲड. रेवन भोसले समाजवादी पार्टी 167, शहाजहान पैगंबर शेख बहुजन महा पार्टी 117, अरुण शिवलिंग जाधवर 351,आसिफलायकाली जमादार 323, गुरुदास संभाजी कांबळे 472, दिनेश रोहिदास मांगले 236, देशमुख विनय विश्वासराव 132, नूरजहाँ सोहेल शेख 694, बंडू शेपू पोळ 787, राहुल रामहरी मोटे 890, लक्ष्मीकांत श्रीपती आटूळे  1254, सोमनाथ सोपान कदम 858, संभाजी नानासाहेब शिंदे 132,व नोटा 688 मतदान मिळाले आहे .


पोस्टल बॅलेटचे 197 मतदान बाद

निवडणूक विभागाने मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी जनजागृती करत ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन मतदान घेतले. काही दिव्यांग अपंग बांधवांचेही घरी जाऊन मतदान घेतले. मात्र यात 197 मतदान बाद झाले आहे. कोरा बॅलेट पेपर असणे, पुढे मार्ग करणे, मतदाराने घोषणापत्र न भरल्यामुळे, एक एक अपेक्षा जास्त मार्क करणे,दोन उमेदवाराच्या मध्यम आर्क करणे याचा अधिकारणामुळे 197 मतदान बाद झाले.


पोस्टलसह 688 मतदारांनी उमेदवारांना नाकारले

परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, रासप, मनसे घटक पक्षसह अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभे होते. एव्हीएम यंत्राच्या माध्यमातून 672 मतदारांनी उमेदवारांना नाकारले. एवढेच नव्हे तर पोस्टद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात देखील 16 मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. अशा एकूण 688 मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे.


परंडा विधानसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे वगळता उर्वरित 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. निवडणुका सर्वच राजकीय पक्ष व पक्षाने प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले.

वैशाली पाटील

निवडणूक निर्णय अधिकारी परंडा.

 
Top