तुळजापुर  (प्रतिनिधी)- अंनत श्री विभूषीत जगदग़ुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज  दक्षिण पीठ नानिजधाम यांचे सिघ्द पादुका दर्शन व प्रवचन  सोहळयाचे आयोजन गुरुवार दि.14 नोहेंबर रोजी सकाळी 10 वाजता  नगरपरिषद अग्निशामक केंद्र पार्किंग मैदान धाराशिव रोड तुळजापूर प्रांगणात  आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असुन कार्यक्रमाच्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवुन व मंडपाचे भूमीपूजन करून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. या प्रसंगी  मराठवाडा उपपीठाचे सहपीठ प्रमुख काकासाहेब वनारसे, प्रोटोकॉल अधिकारी शिवाजी पाटील, जिल्हानिरिक्षक साहेबराव आहेर, जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर, उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोसले, तुळजापूर तालुकाध्यक्ष दीपक मुळे, या कार्यक्रमासाठी उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परंडा या तालुक्याचे तालुकाध्यक्ष तसेच तालुका सेवा समितीचे सदस्य, आरती केंद्राचे प्रमुख या सह कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी आदी परिश्रम घेत आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उमरगा, लोहारा, तुळजापूर, कळंब या तालुक्यातील भक्त मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव सेवा समितीच्यावतीने स्वरूप संप्रदाय जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top