धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजेंद्र प्रसाद संविधानासह प्रतिमापुजन करुन पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांनी संविधान विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तसेच २६ नोव्हेंबर मुंबई येथील हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी कलाध्यापक शेषनाथ वाघ सहशिक्षक भारत गवळी , सुरेंद्र पडवळ , अमितकुमार काकडे , दिपक केंगा शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते . पर्यवेक्षक निखीलकुमार गोरे यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान पठन केले.