तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक वारसा सप्ताहामुळे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय, त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर यांची विद्यार्थी, विद्यार्थीनींनी पहाणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी नवनाथ पांचाळ, शरद सोनवणे, एम.एन.शितोळे, विलास तुपे, विवेक उबाळे, किसन काळे, अविनाश राठोड, सलमान पठाण, मेघा राऊत, सविता बांगडे, गिरीष चव्हाण, भाग्यश्री बिराजदार, दुर्गश नानजकर, माऊली नानजकर आदी उपस्थित होते.