तुळजापूर - तालुक्यातील  काक्रंबा येथील   श्रीखंडोबा  मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून,  खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम धार्मिक विधी   ४ डिसेंबर ते १२डिसेंबर २०२४ या  रोजी आयोजित केला आहे.

बुधवार - दि. ०४.धार्मिक  पुजा विधी प्रारंभ, गुरुवार - दि.०५. - खंडोबा मूर्ती पूजन, शुक्रवार  दि.०६ खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा,  रविवार दि.०८  रोजी महाप्रसाद अन्नदान असे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत दररोज धनगरी ओव्या वाघ्या मुरुळी तसेच किर्तन कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सोहळ्यास पंचक्रोषीतील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन  समस्त काक्रंबा ग्रामवासियांनी केले आहे.


५१ लाख रुपये खर्चुन बांधलेल्या मंदीरात जुनी मुर्ती  प्रतिष्ठापना 

काक्रंबा येथे श्रीखंडोबा मंदीर जुने  झाल्याने ते पडण्याचा अवस्थेत होते शेवटी ५१लाख रुपये खर्चुन जुन्याच जागेवर नव्याने मंदीर उभारले असुन जुन्याच मुर्ती प्राणाप्रतिष्ठापना या मंदीरात  करण्यात येणार आहे. 

 
Top