धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील डोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट क्र.-6 चा दुसरा गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दि.25 नोव्हेंबर रोजी पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी पहिल्या 2023-24 च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा शब्द मोळी पूजना दिवशीच दिला होता. कारखान्यास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला 2 हजार 825 रुपये सर्वाधिक उच्चांकी दर देऊन शब्द पाळला आहे. त्याबरोबरच आ प्रा.डॉ. सावंत यांनी चालू गळीत हंगामाच्या शेतकरी स्नेह मेळाव्यातच परिसरातील इतर सर्व कारखान्याच्या तुलनेत या वर्षी देखील इतर कारखान्यांपेक्षा प्रती मेट्रीक टनास 51 रुपये जास्ती दर देण्याचे जाहीर केलेले आहे. तसेच धाराशिव, तुळजापूर, कळंब व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी कारखान्यास द्यावा असे आवाहन सावंत यांनी केले. यावेळी ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ, गफार  काझी, संग्राम देशमुख, दत्ताभाऊ तिवारी, अमोल पाटील, राजपाल देशमुख, राहुल वाकुरे, जे.के. काझी, एस.के. काझी, कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर देशमुख, चिफ अकौंटंट बिराजदार, चिफ केमिस्ट आवाड, मुख्य शेती अधिकारी पुंड, डिस्टलरी मॅनेजर पाटील, शिरसाठ यांच्यासह कारखाना परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top