भूम (प्रतिनिधी)-  बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील रहिवासी (हल्ली मुक्काम भूम)सूर्यकांत महादेव बाबर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान पुणे येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सून नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार आशिष बाबर यांचे वडील होत. त्यांच्यावर आगळगाव तालुका बार्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते.


 
Top