धाराशिव प्रतिनिधी- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्रा. सबा शेख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची इंग्रजी विषयातून पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय 'अलीस मुनरो यांच्या लघु कथेतील स्त्री पात्राचे चित्रण' हा होता. तर त्यांच्या मार्गदर्शक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशीच्या माजी प्राचार्य डॉ. शारदा मोळवणे या होत्या.
या संशोधन कार्यात प्रा. सबा शेख यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभागप्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्याकडून सातत्याने प्रेरणा मिळाली. यापूर्वी प्रा. सबा शेख यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भाग घेऊन शोधनिबंधाचे सादरीकरण व प्रकाशन केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचे संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत.
तसेच त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेली सेट परीक्षा देखील इंग्रजी विषयातून उत्तीर्ण आहेत. त्यांनी विधी क्षेत्रातील एल.एल.बी. पदवी देखील यशस्वी रित्या पुर्ण केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशात त्यांची आई असीमुन आणि वडिल एकबाल यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचबरोबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपपरिसर धाराशिव येथील प्रा.डॉ. जी.डी. कोकणे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल प्रा. सबा शेख यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.