धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे अधीकृत उमेदवार अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात गावभेट दौ-यात तुळजापूर विधानसभा क्षेत्राचा जाहीरनामा, ध्यास शाश्वत विकासाचा, तुळजापूरच्या संपूर्ण वैभवाचा यावर आपल्या भाषणामध्ये जोर दिला.
यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील कारभार निस्वार्थीपणे, सुसूत्र चालवणार,श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा शहराच्या चारीही बाजुनी केला जाईल. जेणेकरून येथील रहिवासी व्यापारी व पुजारी विस्थापित होणार नाहीत व यासाठी लागणारा निधी राज्य सरकार व केंद्र सरकार कडून जास्तीत जास्त खेचून आणला जाईल. श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना संपूर्ण सेवासुविधा मिळऊन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल उभारले जाईल. अद्ययावत ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालयाना अद्ययावत केले जाईल. शहरात भव्यदिव्य असे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व पर्यटन स्थळे निर्माण करून संपूर्ण तालुक्यातील जनतेला पर्यटनातुन रोजगार कामधंधे उभा करेन. श्रीक्षेत्र तुळजापूर मध्ये पुजाऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर हे शासकीय अधिपत्याखाली आणणार, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे अर्धवट राहीलेले काम आमदार झाल्या झाल्या पुर्ण करेन व बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा देणार. शेतकऱ्यांचे थकीत पीककर्जासाठी बँका अन्याय करत आहेत. जाचक नियम लाऊन वसुली केलीजात आहे. ते थांवणार,तालुक्यातील सहकारी संस्था उदा.सूतमिल,साखर कारखाने, दुध प्रक्रिया उद्योग चालू करणार,नवीन उभारणी करणार, खेडोपाडी वस्त्यानां जोडणारे मार्ग, रस्ते दुरूस्त करून, शेतरस्ते तयार करणार, आणि बंद असलेले खुले करणार,माझ्या विधानसभा क्षेत्रात प्रत्येक वेळी उद्घाटने न करता आधी पुर्ण बांधुन प्रेरणादायी महापुरुषांचे पुतळे स्मृती स्थळे उभारणार, माझ्या विधानसभा क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा अपघात झाला असेल तर त्यांना आर्थिक मदत करणार, तालुक्यात जाती-धर्मात तेढ भांडणे न लावता,बंधुभाव भाईचारा निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, माझ्या क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थी युवक महीलांचा यथोचित सत्कार समारंभ करून त्यांना प्रोत्साहन देणार, महीलानां आर्थिक द्रष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी लघु उद्योग उभारणी करणार, गाव तिथे महीला सभाग्रह. त्यामध्ये बचतगटाच्या उत्पादनानां चालना देणार, गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नं कार्यासाठी आर्थिक मदत करणार, प्रत्येक नागरीकांला सक्षम आरोग्य सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार,वृक्ष लागवड करून संबंधित वृक्षाचे संगोपन करून ती मोठी करणार, शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी सोलर पंप मिळऊन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, महावितरण ची वीज शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध करून देणार, सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करणार, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणार, पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, प्रत्येक समाजासाठी सभागृह बांधून देणार, गोरगरिबांना घरकुल योजना निस्वार्थीपणे राबवणार, बारा बलुतेदाराच्या धंद्यानां आर्थिक मदत करणार, गाव तिथे अद्यावत व्यायाम शाळा उभारणार,प्रत्येक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणार,पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारणार,तुळजापूर शहरात गो शाळा उभारणार इत्यादी आश्वासनांची पुर्तता करणारच असा संकल्प केला आहे.