तेर (प्रतिनिधी)- तेरचे रहीवाशी व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आ.राणाजगजितसिंह पाटील हे प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.37081 मतांनी इतक्या प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल आ.पाटील यांचा भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी  सत्कार केला .अनेक महीलानी आ.पाटील यांना औक्षण केले.

 
Top