धाराशिव (प्रतिनिधी)- पाडोळी(आ.) ता.जि.धाराशिव येथे दि.12 आँक्टोबर रोजी रूपामाता नॅचरल शुगरच्या प्रांगणात औसा विधानसभा व लातूर विधानसभा मतदारसंघातील रूपामाता मिल्क  व रूपामाता नॅचरल शुगरच्या दूध व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिपावली मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम औसा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अभिमन्यू पवार व आयोजक रूपामाता  उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

 यावेळी अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात रुपामाता उद्योगसमूहाचा विस्तार असून औसा मतदारसंघातील 110 गावात दूध उत्पादक शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात असून आमच्या तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा ऊस 'रुपामाता' गाळप करत असुन त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अँड. गुंड यांनी रूपामाताचा विस्तार हा धाराशिव जिल्ह्यासह बीड व  लातूर जिल्ह्यात असून या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यास मी कटिबद्ध असल्याचे सांगून, अभिमन्यू पवार औसा विधानसभा  व लातूर ग्रामीणचे उमेदवार रमेश अप्पा कराड यांना मतदारांनी पाठबळ देण्याचे आवाहन केले.

व्यासपीठावर जि,प.  चे माजी उपाध्यक्ष सुधाकर  गुंड (गुरुजी) सूर्यकांत (गुरुजी) पिसाळ,एकंबी तांडाचे उपसरपंच बाळासाहेब जाधव, ह. भ. प. बालाजी महाराज सूर्यवंशी, बेलकुंडचे सरपंच विष्णू महाराज कोळी, रूपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड,  सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top