धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय सेवा योजना व नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव यांच्या वतीने धाराशिव शहरामध्ये मतदान जनजागृती अभियान राबाविण्यात आले. शहरवासियांना येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली. शहराच्या ताजमहाल टॉकीज, सेंट्रल बिल्डिंग, काळा मारुती या भागामध्ये मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
या पथनाट्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळाला. या पथनाट्या मध्ये सुमित ठानांबिर, सचिन शिंदे, काजल बायस गणेश मरोड, यशवर्धन सूर्यवंशी, वैभव भोरे, मोहिनी जोशी, अजय पाटील, प्रेम जाधव, गणेश टेळे, रोहित देशमुख, सुमीत शिंदे, दिनकर नागरे, आणि सुनील मुऱ्हाडे यांनी सहभाग नोंदविला. सदरील मतजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाट्यशास्त्र विभागातील डॉ. गणेश शिंदे, डॉ. उषा कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. राहुल खोब्रागडे व डॉ. जितेंद्र शिंदे यांनी सहभाग नोंदविला. तसेच, या उपक्रमासाठी सुधा साळुंखे, शिक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी मदत केली.