धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 मध्ये वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने या मतदारांना गृह मतदानाची सोय केली आहे.या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर 5 दिवसात नमुना 12 ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते.
परंडा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 695 आणि 127 दिव्यांग अशा एकूण 822 मतदारांनी नोंदणी केली आहे. या मतदारसंघात 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान गृह भेट टपाली मतदान घेण्यात सुरुवात झाली आहे. गृहभेट टपाली मतदानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी 85 वर्षांमधील 366 आणि 71 दिव्यांग अशा एकूण 437 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित दोन दिवशी मतदान पथके संबंधित ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर 5 दिवसात नमुना 12 ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते. जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 695 आणि 127 दिव्यांग असे एकूण 822 ज्येष्ठ व दिव्यांग मतदार 18 नोव्हेंबरपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहे.