धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिन आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बि. आर. आंबेडकर प्रतिष्ठान धाराशिवच्यावतीने भिम बुद्ध गायिका मंजुषा शिंदे यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहाने पार पडला. 

लय बळ आलं माझ्या भिमाच्या पोरात या गाण्याचा जगभर डंका पसरविणाऱ्या गायिका मंजुषा शिंदे यांचा भारतीय संविधान दिनानिमित्त धाराशिव येथील लेडीज क्लब मध्ये गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित शिंगाडे, संतोष वाघमारे व त्यांचे सहकारी यांनी धाराशिव येथे प्रथमच बि आर आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दलित चळवळीत काम करणाऱ्या बि आर आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या संविधान दिनानिमित्त करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प व संविधान उद्देशिका प्रत देऊन करण्यात आले यावेळी बि. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित शिंगाडे, सचिव संतोष वाघमारे,मार्गदर्शक रावसाहेब मस्के,विकी नाईकवाडी,परमेश्वर माने,विकास खुने प्रमोद ठवळे,किरण कांबळे, प्रतिक माळाळे,रोहन शिंगाडे,धम्मपाल वाघमारे,रणजित कांबळे, बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी,सर्व मित्र परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विकी नाईकवाडी सह इतरांनी परिश्रम घेतले. तर आभार रोहित शिंगाडे यांनी मानले.

 
Top