धाराशिव (प्रतिनिधी)-  येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे. यासाठी मतदान जागृती कक्षाच्या (स्वीप) वतीने आज 14 नोव्हेंबर रोजी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,धाराशिव येथे मतदानाबाबत पोदारच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारला.

मतदानाविषयीच्या या जनजागृती कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाविषयी शपथ देऊन त्यांच्या पालकांना, नातेवाईकांना तसेच शेजाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करायला जाण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.ढाकणे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती रमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. या मतदान जनजागृती कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top