तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व पालकमंञी पदी पुनश्च डॉ. तानाजी सावंत यांची नियुक्ती व्हावी. यासाठी शिवसेना (शिंदे गट ) परांडा शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी बुधवार दि. 26 नोव्हेंबर रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेची महाआरती करुन साकडे घालण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष सनी पवार, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख जावेदभाई शेख. सरंपच बाकरवाडी नवनाथ सुर्यवंशी, खानापूर सरपंच अमोल निकम, दादा घोरपडे, राहुल सुरवसे. प्रशांत वाघमारे, अविनाश खानापूरे, समर्थ उज्जनकर, विजय भागवत, गणेश मडके, समीर शेख, विकास ऐडके, रुषी विटकर, सोनू काळे, बाळा पवार, नितीन पवार, आकाश गोरे, नितीन पवार, राजकुमार ढवळे, विशाल देवकते,मनोहर मानेसह शिवसेना शिंदे गट पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.