तुळजापूर (प्रतिनिधी) -  तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विभागातील तुळजापूर पोलिस ठाणे हद्दीतील तुळजापूर नळदुर्ग तामलवाडी पोलिस स्टेंशन अंतर्गत 100 शस्ञ परवाना पैकी  98 शस्त्र (बंदूक) पोलिसांकडे जमा झाले आहेत. उर्वरित  दोन शस्ञ बँकेकडे असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर त्या  लवकरच जमा करून घेण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस विभागाने सांगितले.

तुळजापूर  विभाग पोलिस ठाणे हद्दीत 100 शस्त्रे असून 98   जमा करून घेण्यात आली आहेत. अद्याप 2 शस्त्रे जमा होणे बाकी आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे व्याप्ती फार मोठी आहे. या कार्यवाहीमुळे तुळजापूर विधानसभा निवडणूक मतदारसंघात भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. अनुचित प्रकारावर आळा बसणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 
Top