तुळजापूर (प्रतिनिधी)- अंनत श्री विभूषीत जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांचे सिद्ध पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन दि. 14 नोहेंबर गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषद अग्निशामक केंद्र पार्किंग मैदान धाराशिव रोड तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. तरी जिल्हातील, शेजारील जिल्हा परिसरातुन जास्तीत जास्त भक्तगणांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी प्रोटोकाँल अधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा निरक्षक साहेबराव आहेर, धाराशिव जिल्हा सेवा समिती अध्यक्ष संतोष केसकर, मराठवाडा उपपीठाचे सहपीठ प्रमुख काकासाहेब वनारसे, उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोसले, धाराशिव तालुका सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण अडसुळे, सचिव दयानंद इंगळे, प्रसिद्धीप्रमुख रमेश कोळगे हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.