तुळजापूर (प्रतिनिधी) -  241 तुळजापूर  विधानसभा मतदार संघात  शनिवार दि. 9 नोव्हेंबर व रविवार दि. 10 नोव्हेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत  निवडणुक विभागाचे पथक सकाळी  7 ते सांयकाळी 6 या कालावधीत  ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग  असलेल्या 341 मतदारांच्या घरी  जावुन गृह मतदान उपक्रम अंतर्गत 676 पैकी 642 मतदारांना घरबसल्या मतदान संधी प्राप्त करुन दिली. यातील अनेक मतदारांनी आम्हाला ही सोय निवडणूक विभागाने करुन  दिल्याबद्दल आभार मानले. 

निवडणुक विभागने या मतदारांच्या घरी जावुन गोपनियतेचा भंग न करता गृह मतदान  करुन घेतले. या मतदान प्रक्रियेसाठी 676 मतदार पाञ होते. त्या पैकी 642  मतदारांनी घरात बसुन मतदानाचा हक्क बजावला. यात शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी 341 व रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी 301 असे एकुण 642 मतदारांनी मतदान केले. सदरील मतदान पेट्या संरक्षणात ठेवण्यात आल्या असुन 23 नोव्हेबर रोजी या उघडल्या जाणार आहेत. यात  दिव्यांग स्ञी 37, पुरुष 54 तसेच 85 वर्षावरील जेष्ट नागरिक स्ञी 316, पुरुष 235 एकुण 676 पैकी 642 मतदारांनी गृह मतदान उपक्रम मधुन मतदानाचा हक्क  बजावला. अनेक मतदार मयत झाल्यामुळे तर काही गावी हजर नसणे मुळे घेता आले नाही. ही गृहमतदान प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी संजय डव्हळे व  सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शन खाली पार पडली.

 
Top